आरसे

आरसे
अनिरुद्ध बनहट्टी

शरिराची कैद मनाला कोडे पडले कसे
एकमेकांच्या नयनी बघती आंधळे आरसे

असह्य खाई पूर्ण पोकळी मनास नाही थारा
शीड जसे हे प्रेत लटकते जराहि नाही वारा

अनंत सागर सुकाणूविना भरकटले जहाज
किती युगांचा प्रवास उरला काहि कळेना आज

राखाडी रंग सर्वत्र फासला पडला रात्री चकवा
कोण कुणाला मार्ग दाखवे चक्रव्यूह हा फसवा

अंधाराच्या तळात जाउन मूळ विषारी डसे
विषवृक्षाच्या छायेमध्ये क्रूरपणाचे ठसे

आकाश पूर्ण डागाळुन गेले कृष्णमेघ हे जमले
उदासीनता दाटुन आली काळोखाचे इमले

गुरुत्वाकर्षण वाढत गेले असह्य झाला वेग
दरीतळाशी आदळतांना दगडालाही पडली भेग

drawing_hands
त्या भेगेतच ठिणगी दोन आरशांमध्ये पडली
अनंत पोकळी प्रतीबिंबांच्या माळेने उजळत गेली

drawing_hands

सर्व रिकामे अवकाश बहरले उगवला प्रखर हा तारा
गर्भार जाहले शीड जणू अन पिता जाहला वारा

समुद्र थेंब जाहला, तीरासम धावे जहाज
अनंत युगांचा प्रवास झाला एका क्षणात आज

सतत उसळते कारंजे सुखद हे उसंत नाहि जराशी
हिरवे ओले कंच गवत हे श्रांत तृषार्त प्रवासी

सोनेरी उजळली प्राची रंग स्फोटला भगवा
जणू विश्व हे आज जन्मले सूर्य उगवला नवा

तेजाच्याही तीव्रतेहुनी शुभ्र असावे कसे
अमृतवेला पसरत गेली पानोपानी आरसे

कृष्णमेघ हे बरसुन गेले पाउस पाडुन दमले
वारादेखिल ओला झाला उमलुन आली कमळे
 पिसाहूनही हलके होता वरती जाण्या वेग
स्फोट मनाचा झाला जणु अन असह्य हा आवेग

मनाला कोडे पडले शरीर पारदर्शक झाले कसे
एकमेकांच्या समोर ठाकले स्वयंप्रकाशी आरसे

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s